लायपोसक्शन: समज , गैरसमज आणि वस्तुस्थिती

वाढती धावपळ,त्या अनुषंगाने आलेले जंक फूड, तेलकट पदार्थ , भौतिक सुखसोयींचा  सुकाळ  यामुळे स्थूलपणाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. तो टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यांची खूप मदत होते. या गोष्टी पाळूनही शरीरावरची जी चरबी कमी होत नाही,ती आपल्याला ”लायपोसक्शन” द्वारे कमी करता येते. शरीराचे विविध भाग जसे मांड्या , कंबर , नितम्ब, पोटऱ्या, पाठ,पोट , छाती, बाहू , मान , हनुवटी , गाल यांवरील चरबी याद्वारे सहजरित्या कमी करून साजेसा आकार देणे शक्य आहे.

हे ऑपरेशन साधारणतः regional anaesthesia किंवा general anaesthesia देऊन केले जाते

कुठल्याही लायपोसक्शन सर्जरी मध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी  असतात,

१: त्वचे खालील चरबी वितळवीने आणि

२: वितळविलेली चरबी काढून घेणे

चरबी वितळविण्यासाठी Tumuscent Fluid Injection , Ultrasonic Assisted , लेसर Assisted पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो . Tumuscent Liposuction हि सगळ्यात सुरक्षित आणि जास्त वापरली जाणारी पद्धत आहे.  सर्वप्रथम यामध्ये विशिष्ठ द्रव्ये आणि औषधे यांचे मिश्रण एका छोट्याश्या छिद्रातून  चरबीमध्ये सोडले जाते ,व त्यानंतर ७ ते १० मिनिटे थांबावे लागते ; ज्याच्यामुळे फॅट सेल्स सेपरेट व्हायला मदत होणे.  वितळविलेली चरबी काढून घेण्यासाठी सक्शन machine चा वापर केला जातो आणि सूक्ष्म अशा छिद्रातून  चरबी एकाउपकरणा मार्फत शोषून घेतली जाते. चरबी शोषून घेतल्यानंतर त्वचेखाली  tunnels  तयार होतात आणि नंतर ते collapse होऊन त्या भागाचा आकार बदलण्यास मदत होते.

साधारणतः एक ते दीड तासात हे ऑपरेशन  संपते.

या शस्त्रक्रियेनंतर काही काळजी घ्यावी लागते का ?

रुग्णाचे वय ३५ वर्षाच्या  आत  असल्यास लायपोसक्शन नंतर लोम्बकळणारी त्वचा ही आपोआपच कमी होऊ शकते. त्यासाठी ऑपरेशन नंतर  ५ ते ६ महिन्यांसाठी compression Garment  वापरणे आवश्यक आहे. साधारणतः ३५ वर्षाच्या पुढे वय असल्यास चरबी काढल्यानंतर त्वचा आपोआप मागे न जाता ती लोम्बकळ्ते (ज्याला Loose Skin folds असे म्हणतात) त्यासाठी लायपोसक्शन बरोबर ती काढून टाकणे जास्त फायदेशीर ठरते. त्याला लायपो-ऍबडॉमिनोप्लास्टी (Tummy Tuck) असे म्हणतात. अश्याच पद्धतीचे “टक्स ” किंवा “लिफ्ट्स” मांड्या, नितम्ब, हात आणि चेहऱ्यासाठी केले जाऊ शकतात. त्याला क्रमशः Thigh lift, Buttock lift, Arm Lift असे म्हणतात.

महिलांना याचे अनेक प्रकारे फायदे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे  प्रसूतीनंतर झालेले बेढब पोट. त्याला  पूर्ववत करण्यासाठी Liposuction आणि Abdominoplasty (tummy tuck) या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करून सुडोल आकार आणता येतो. याला  Mommy Makeover असे म्हणतात . त्याचबरोबर पोटाचे खेचले गेलेले स्नायू सुद्धा पूर्ववत केले जातात. जर पोटाचा hernia (व्हेंट्रल hernia ) असेल तर त्याचा उपचार ह्याच ऑपरेशन दरम्यान केला जातो. tummy tuck बरोबरच स्तनांना पण Breast Reshaping Surgery करून सुडौल आकार देता येतो.

स्तनांचा आकार आपल्या किंवा आपल्या पार्टनर च्या अपेक्षेपेक्षा कमी असल्यास तो Silicone Gel Implants  वापरून आपल्याला हवा तेवढा केला जाऊ शकतो , त्याला Breast Augmentation अथवा Augmentation Mammoplasty असे संबोधले जाते.  वयोमानानुसार किंवा प्रसूतीनंतर झालेली स्तनांची लटक Mastopexy अथवा  breast lift सर्जरी मध्ये  कमी करून त्यांना अधिसारखेच सुडौल करता येते.

तसेच , वाजवीपेक्षा जास्त मोठे स्तन असल्यास त्यामुळे सारखी मान , पाठ अथवा खांदे  दुखणे , ब्रा स्ट्रॅप्स मुळे खांद्यावर वळ उमटून ते दुखणे, स्तनांखालील भागात गचकर्ण होणे आणि न्यूनगंड निर्माण होऊन लोकांना टाळणे अशी लक्षणे दिसू लागतात. ह्याला आपण breast reduction अथवा Reduction Mammoplasty  सर्जरी द्वारे कमी करू शकतो .

काहीवेळा आपल्याला पुरुषांमध्येही स्तनांची अनावश्यक वाढ झालेली दिसून येते , ती कशामुळे त्यावर काही उपाय:

मुले किंवा पुरुष यांच्यामध्ये स्तनाची  प्रमाणापेक्षा जास्त   मेदयुक्त वाढ होणे , ज्याला आम्ही Gynaecomastia म्हणतो.   अनुवंशिकता , काही औषधे , वजनात वाढ ,  आणि लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणाऱ्या  संप्रेरकांचा असमतोल (Hormones responsible for sexual development) झाल्याने हि वाढ होते . या असमतोलाचा प्रभाव एका बाजूला किंवा दोघे बाजूला जाणवतो. दोन्ही बाजूला असल्यास कधी कधी त्यांमध्ये असमानता पण असू शकते. नवजात मुले, पौगंडावस्थेतुन जाणारी मुले , आणि वयोवृद्ध माणसे  या वयोगटात  संप्रेरक पातळीच्या  बदलांचा परिणाम (Hormonal Imbalance) म्हणून gynecomastia विकसित  होऊ शकतो . जरी हि एक गंभीर समस्या नसली तरी विशिष्ठ वयोगटात ( खासकरून पौगंडावस्थेत )  हे न्यूनगंडाचे कारण बनु शकते.

स्तनात गाठ जाणवणे, ती सतत किंवा हात लावल्यावर दुखणे, स्तनाग्रातून पाणी येणे यांपैकी काहीही जाणवल्यास डॉक्टरांना त्वरित दाखविणे गरजेचे आहे. पुरुषांमधील ही अयोग्य स्तन वाढ Liposuction द्वारे व्यवस्थित  करणे सहज शक्य आहे. साधारणतः पूर्वीच्या काळी ह्याचे ऑपरेशन हे छातीवर मोठा छेद (Incision) करून केले जात असे, त्यामुळे तिथे मोठा व्रण तयार होत असे.  अत्याधुनिक अश्या लायपोसक्शन पद्धतीने आता हे करणे अधिक सोपे झाले आहे. यामध्ये शरीराला पूर्ण भूल दिल्यानंतर सूक्ष्म अश्या  छिद्रामधून स्तनाच्या अवतीभोवती असलेली चरबी शोषून घेतली जाते. यानंतरहि जो भाग कमी झाला नाही (Glandular Portion) तो पण आवश्यकता जाणवल्यास  एका छोट्या छिद्रातून बाहेर काढला जातो. ह्या ऑपरेशन पद्धतीमध्ये कमीत कमी व्रण छातीवर राहील याची काळजी प्लास्टिक सर्जन घेतात.

वाढलेले पोट  हि समस्या पुरुषांनाहि  भेडसावनारी समस्या आहे   . त्यामुळे लायपोसक्शन किंवा abdominoplasty या आधुनिक वैद्यकीय उपचाराचा   फायदा पुरुष मंडळी पण घेऊ शकतात.

लायपोसक्शन सर्जरीचे काही संभाव्य धोके आहेत का?

जर आपण मध्यम स्थूल असाल, वजन आटोक्यात असेल आणि आपल्या अपेक्षा ”वास्तविक” असतील तर ही प्रक्रिया सुरक्षित आहे. लायपोसक्शन नंतर शरीराचा भाग निळसर/काळसर पडणे , थोड्या प्रमाणात दुखणे जाणवू शकते जे कि  डॉक्टरांनी दिलेल्या औषोधोपचारानंतर आटोक्यात येते , पण या गोष्टी १० ते १५ दिवसात ओसरतात.

तसेच  , लायपोसक्शन ही  वजन कमी करण्यासाठीची सर्जरी नसून शरीराला आलेला बेढबपणा कमी करून पूर्ववत आकारात आणण्यासाठी आहे याची नोंद घ्यावी.

जास्त स्थूल असणाऱ्यांना  वजन कमी करण्यासाठी  ”बेरियाट्रिक सर्जरी” हा उत्तम पर्यायी मार्ग आहे.