पुरुषांमधील अयोग्य स्तनवाढ ठरू शकते न्यूनगंडाचे कारण

Gynaecomastia म्हणजे पुरुषाच्या स्तनाची प्रमाणाबाहेर मेदयुक्त वाढ होणे. हॉर्मोन्सचा असमतोल  झाल्याने हि वाढ होते . या असमतोलाचा प्रभाव एका किंवा दोघे बाजूला जाणवतो. दोन्ही बाजूला असल्यास कधी कधी त्यांमध्ये असमानता पण असू शकते. ५० % पुरुषांमध्ये हि समस्या आढळून येते. 

नवजात मुले, पौगंडावस्थेतुन जाणारी मुले , आणि वयोवृद्ध माणसे  या वयोगटात  gynecomastia विकसित  होऊ शकतो .

आणि असे होण्याचे कारण काय?

संप्रेरकांचा असमतोल ( Hormonal Imbalance) हा अनेक कारणांमुळे होऊ शकतो. त्याला अनुवंशिकता , काही औषधे , शरीरसौष्ठ  वाढविण्यासाठी स्टेरॉइड्स वापरणे, शरीरावर  इतरत्र वाढलेली चरबी (Generalised fat deposition)  , विशिष्ठ वायरल इन्फेक्शन्स आणि इतर बरिच कारणे जबाबदार असू शकतात. 


अश्या
पेशंट्सना कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागते?

जरी हि एक गंभीर समस्या नसली तरी विशिष्ठ वयोगटात ( खासकरून पौगंडावस्थेत ) मुलांना ती त्रासदायक वाटू शकते. अशी मुले किंवा पुरुष यांना छातीत गाठ जाणवणे, ती गाठ दुखणे अशी लक्षणे दिसू लागतात . अयोग्य स्तनवाढी मुळे  मित्र मंडळींकडून सारखे चिडविले जाणे , त्यामुळे बाहेर खेळायला / पोहायला न जाणे , स्तनवाढ लपविण्यासाठी खांदे पुढे काढून चालणे आणि त्यामुळे आलेले पोस्चयुरल प्रॉब्लेम्स , साहजिकच त्या अनुषंगाने आलेला एकटेपणा ह्या गोष्टींमुळे  त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो.

Problems with Gynecomastiaह्याच्यावर काय उपचार पद्धती उपलब्ध आहे ?

वयोमानानुसार झालेली स्तनवाढ हि बहुतांशी आपोआप ओसरते. समतोल आहार, व्यायाम, आणि औषधे (कुठल्या आजारामुळे हि अवस्था झाल्यास) छातीमध्ये झालेली हि वाढ काही अंशी कमी होऊ शकते. तसे न झाल्यास प्लास्टिक सर्जरी द्वारे त्याला कमी करता येते. 

ऑपरेशन आणि त्यानंतरची काळजी ह्याबद्दल जरा सांगाल का?

स्तनात गाठ जाणवणे, ती सतत किंवा हात लावल्यावर दुखणे, यांपैकी काहीही जाणवल्यास  त्वरित प्लास्टिक सर्जनना दाखविणे गरजेचे आहे.

कुठलाही विशिष्ठ व्यायाम केल्याने अथवा आहार ( Diet ) पाळल्याने किंवा कुठलीही औषधे घेतल्याने / मसाज केल्याने हि स्तनवाढ आपोआप नाहीशी होत नाही!

साधारणतः पूर्वीच्या काळी ह्याचे ऑपरेशन हे छातीवर मोठा छेद (Incision) करून केले जात असे, त्यामुळे तिथे मोठा व्रण तयार होतो. अत्याधुनिक अश्या लायपोसक्शन पद्धतीने आता हे करणे अधिक सोपे झाले आहे. यामध्ये शरीराला पूर्ण भूल दिल्यानंतर सूक्ष्म अश्या  छिद्रामधून स्तनाच्या अवतीभोवती असलेली चरबी शोषून घेतली जाते.

यानंतर हि जो भाग कमी झाला नाही (Glandular Portion) तो पण आवश्यकता जाणवल्यास  एका छोट्या छिद्रातून बाहेर काढला जातो. 

ह्या ऑपरेशन पद्धतीमध्ये कमीत कमी व्रण छातीवर राहील याची काळजी प्लास्टिक सर्जन घेतात. 

 

हे ऑपरेशन डे केअर सर्जरी (हॉस्पिटल मध्ये राहण्याची गरज नाही ) म्हणून पण केले जाऊ शकते. चरबी काढून घेतलेल्या जागी  पाणी किंवा  रक्त जमा होऊ नये आणि तिथली सूज कमी व्हावी यासाठी ऑपरेशन नंतर लगेचच कम्प्रेशन ड्रेसिंग दिले जाते. २ ते ३ दिवसानंतर ते बदलून कम्प्रेशन गारमेंट दिले जाते. ह्यामुळे वर नमूद केलेल्या फायद्यांव्यतिरिक्त, छातीच्या भागाला आधार मिळून दुखणे कमी होते आणि ऑपरेशन पासून शरीराला मिळालेला आकार टिकून राहतो आणि त्याचबरोबर वाढलेली कातडी मागे ओसरण्यासहि  (Skin Redraping) मदत  होते. कम्प्रेशन गारमेंट कमीत कमी ६ महिन्यांच्या कालावधीसाठी वापरणे आवश्यक आहे. ऑपरेशन नंतर ४ ते ५ दिवस हलके दुखणे जाणवू शकते जे वेदनाशामक औषधे (Analgesics) घेऊन कमी होते. ५ ते ६ दिवसानंतर दैनंदिन कामाला सुरुवात केली जाऊ शकते आणि १ महिन्यानंतर जड वजनांचा व्यायाम चालू करू शकतो.

ह्या ऑपरेशन साठी किती खर्च येतो? आणि हे इन्शुरन्स मध्ये केले जाऊ शकते का?

ह्या ऑपरेशनचा खर्च कुठल्याही इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही.
साधारणतः ४५ ते ५० हजार रुपये हा ऑपरेशनचा खर्च असतो. पण आता खर्चाची काळजी नसावी , कारण आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत वैद्यकीय कर्जाची सुविधा. याद्वारे आपण सुलभ हफ्त्यांमध्ये आपल्या खर्चाची परतफेड करू शकता. अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.

डॉ किरण त्रंबक नेरकर 

प्लास्टिक कॉस्मेटिक   सर्जन ,नाशिक 

Email: [email protected]